माणचा आमदार पुढे तर माढ्याचे खासदार पाठीमागे बसतात; देशातील एकमेव उदाहरण – आ. रामराजे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २४ जानेवारी २०२४ | फलटण |
बोराटवाडीतून फलटणमध्ये आलेल्या आमदाराने तालुयाचे व जिल्ह्याचे वाटोळे करायचे ठरविले आहे. हे आमदार मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर बसलेले असतात. अशा प्रवृत्तीला वेळीच ठेचले पाहिजे. माढ्याचे खासदार हे अशा आमदाराचे ‘पीए’ झालेले आहेत. आमदार पुढे बसतात, तर खासदार पाठीमागे बसलेले असतात. हे देशातील एकमेव उदाहरण आहे. आम्ही सर्व भानगडीतून वर आलेलो आहे. भाजपाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपले चांगले मित्र आहेत. कारण ते प्रामाणिकपणे आपल्या भागाचा विकास करताना दिसतात. आमचा भाजपाला विरोध नसून विकृत मनोवृत्ती ठेवणार्‍या लोकांना आपला विरोध आहे, असे प्रतिपादन आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले.

प्रभू श्रीराम जन्मभूमी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या भव्य मिरवणुकीनंतर विडणी येथे आयोजित केलेल्या जाहीर सभेत श्रीमंत रामराजे बोलत होते. यावेळी आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर, श्रीराम कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, ज्येष्ठ नेते माधवराव अभंग, सर्जेराव नाळे, तंटामुतीचे अध्यक्ष प्रवीण नाळे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

श्रीमंत रामराजे म्हणाले की, माण-खटावच्या आमदाराकडे मुख्य कीडा आहे. तोच तालुका व जिल्ह्याचे वाटोळे करायला निघाला आहे. त्यामुळे मुळातच घाव घालायचा असेल तर मुख्यमंत्री कार्यालयात बसणार्‍या भुकड लोकांवर घातला पाहिजे. हे पनवेलला व त्यांचा गुरू बोराटवाडीला, तेथूनच हे सर्व कारभार करतात. आपले खासदार हे त्यांचे ‘पीए’ आहेत. दुसरा उमेदवार दिला तरी ८० हजारांचे लिड देऊ, असे ते म्हणतात. त्यांच्याकडे एवढी मते असतील व आपल्या मतांची गरज नसेल तर आपण त्यांना आपली मते घ्या, असा का आग्रह करायचा? तुम्हाला तिकिट मिळाले तर तुमची मते घ्या. आपण नोटा करू, इथल्या इथेच त्यांचा काटा निघाला पाहिजे जे लक्षात ठेवा.

श्रीमंत संजीवराजे म्हणाले की, धोम-बलकवडी व नीरा-देवघर या दोन धरणांसाठी श्रीमंत रामराजे महाराजांनी कष्ट घेतले आहेत, हे सर्वांनी पाहिले आहे. नुसत्या दमदाट्या करून विकास घडत नाही. फत फोनच येत असतो, पण पुढे काही होत नाही. आम्हीच केले म्हणणारे त्यांचे नेते आहेत, पण त्यांनी म्हटले म्हणजे ते होत नसते. फलटण तालुयात गेल्या ३० वर्षांपासून श्रीमंत रामराजेंनी शांतता राखली आहे. मात्र, विरोधक सध्या काठ्यांना तेल लावून बसलो असल्याची भाषा करत आहेत. त्या काठ्या बाहेर काढण्याची ताकद त्यांच्यात नाही. आपल्याकडेही बाभळीच्या काठ्या आहेत, पण आपल्याला लोकशाही मार्गाने या प्रवृत्तींना थांबविले पाहिजे. खोट्या केसेस टाकण्याची त्यांची संस्कृती आहे. श्रीमंत रामराजेंनाही खंडणीच्या केसमध्ये अडकविण्याचा प्रयत्न ते करत असल्याचेही संजीवराजे म्हणाले.

या सभेत आ. दीपक चव्हाण, डॉ. बाळासाहेब शेंडे, श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांच्यासह अन्य मान्यवरांनी मनोगत व्यत केले.

या सभेस मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होतो. किशोर ननावरे यांनी आभार मानले.


Back to top button
Don`t copy text!