दैनिक स्थैर्य | दि. १४ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी सकल मराठा समाजाला आंतरवली सराटी, ता. आंबड, जि. जालना येथे १४ ऑक्टोबरला येण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत छत्रपती शिवाजी महाराज यांची सासुरवाडी व छत्रपती संभाजी महाराज यांचे आजोळ असलेले व प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावण झालेली तथा महानुभाव पंथाची दक्षिण काशी असलेल्या फलटण नगरीत येण्याचे निमंत्रण येथील मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांनी त्यांची जालना येथे भेट घेऊन दिले. या निमंत्रणाचे तात्काळ स्वागत करून १४ ऑक्टोबरच्या मराठा समाजाच्या विराट सभेनंतर मी फलटण या रामनगरीमध्ये येईन, असा शब्द मनोज जरांगे पाटील यांनी दिला आणि फलटण शहर व तालुक्यातील आलेल्या मराठा बांधवांचे खास करून युवकांचे मी स्वागत करतो, असे म्हटले.
यावेळी उपस्थित समन्वयकांचे डोळे पान्हावलेले पाहायला मिळाले.