स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त विविध उपक्रमांनी मनोहर मुळीक यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.१७ ऑगस्ट २०२२ । फलटण । स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वराज्य महोत्सव अंतर्गत ‘समूह राष्ट्रगीत गायन’या उपक्रमांतर्गत सकाळी ११.०० वाजता. सामुदायिक राष्ट्रगीत घेण्यात त्यानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत सादर केली.
यावेळी मौजे सासकल तालुका फलटण येथील सासकल गावचे तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष मनोहर संभाजी मुळीक यांनी गावच्या सरपंच उषाताई राजेंद्र फुले, ग्रामपंचायत सदस्य मोहन मुळीक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सासकल व शिवशंकर माध्यमिक विद्यालय सासकल चे मुख्याध्यापक शिक्षक व विद्यार्थ्यांसोबत विविध उपक्रमांनी आपला वाढदिवस साजरा केला. सासकल गावच्या प्रथम नागरिक सरपंच उषाताई फुले, ग्रामपंचायत सदस्य मोहन मुळीक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सासकल व शिवशंकर माध्यमिक विद्यालय सासकल च्या वतीने मनोहर संभाजी मुळीक यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला.


त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त सर्व विद्यार्थ्यांना फळे वाटप केली.त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त शाळेच्या भौतिक साधनांसाठी व शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी मदत करणार असल्याचे सांगितले.तसेच येत्या काळात गावात वृक्षारोपण मोठ्या प्रमाणात करण्यात येणार असल्याचे सांगितले.


यावेळी सासकल गावच्या सरपंच उषाताई राजेंद्र फुले, ग्रामपंचायत सदस्य मोहन मुळीक,जिल्हा परिषद शाळेचे वरिष्ठ मुख्याध्यापक जालिंदर बल्लाळ,शिक्षक सुधीर ढालपे, पदवीधर शिक्षक पांडुरंग निकाळजे, रूपाली शिंदे, शिवशंकर माध्यमिक विद्यालय सासकल चे मुख्याध्यापक तुळशीराम शिंदे, शिक्षक मोहिते सर, सस्ते मॅडम, धनाजी मुळीक सर, अंगणवाडीच्या सेविका पुष्पावती मुळीक, कुंभार, मदतनीस शारदा मुळीक, दिपाली पवार व ग्रामस्थ उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!