
स्थैर्य, कोल्हापूर, दि. १९ : कोल्हापूर नाट्य परिषदेचे माजी अध्यक्ष, प्रसिद्ध बाबला ऑर्केस्ट्रा कार्यक्रमाचे तसेच अनेक नाट्य प्रयोगांचे 25 हुन अधिक वर्षे यशस्वी आयोजन केलेले जेष्ठ व आदरणीय व्यक्ती श्री मनोहर कुईगडे ( वय 85) यांचे खरी कॉर्नर येथील पद्माराजे हायस्कुल समोरील त्यांच्या निवासस्थानी आज बुधवारी पहाटे निधन झाले.
अत्यन्त कष्टमय व संघर्षमय जीवन व्यथित केलेले कुईगडे काकांनी लोकांचे मात्र अविरत मनोरंजन केले. देवानंद यांचे निस्सीम भक्त , इतके की त्यांच्या सारखे कपडे, टाय , सायकल त्यांनी अनेक वर्षे वापरली -आरोग्य सुद्धा सांभाळले..
आख्खे आयुष्य स्वावलंबी म्हणून जगण्यात ते यशस्वी झाले.
संगीत क्षेत्र त्यांचे जीव की प्राण. कल्याणजी आनन्दजी हे त्यांचे आवडते संगीतकार.त्यांचे प्रोग्राम live करन्याची त्यांची ईच्छा मात्र अधुरी राहिली..
त्यांच्या पत्नी अरुंधती यांचे निधन कैक वर्षांपूर्वी झाले, पत्नीवर त्यांचे इतके प्रेम होते की तिच्या मृत्यू पश्चात अनेक वर्षे ते स्वतःच्या हाताने तयार केलेला हार पत्नीच्या फोटो ला नित्यनियमाने घालत होते..
कुईगडे काकांचा मित्रपरिवार मोठा होता.पूर्वीच्या काळी शिवाजी पेठ , महाद्वार रोड परिसरात मनोहर कुईगडे, श्रीनिवास टोपकर, दिवंगत भालचंद्र खांडेकर व हिंदुराव वाझे अशी मित्रांची चौकडी प्रसिद्ध होती.
त्यांच्या पशच्यात दोन मुलगे ऍडवोकेट विश्वजित तसेच ऋषिकेश( KDCC अधिकारी) तसेच परिवार आहे..
सध्याची आणिबाणी परिस्थिती लक्षात घेऊन अंत्यसंस्कार पहाटे उरकण्यात आले.रक्षा विसर्जन आज दुपारी 4 वाजता.