वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर औषधांबाबतचे नियोजन करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त मनिषा जवंजाळ यांच्यावर जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले आदेश

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. ०७: जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग वाढत असून कोविड बाधित रुग्णांवर विविध रुग्णालयामध्ये उपचार सुरु असून त्यांना आवश्यक ती वैद्यकीय सुविधा पुरविणे आवश्यक असून यासाठी पुरेशा प्रमाणात औषधसाठा असणे आवश्यक आहे. याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे व त्याबाबत नियोजन करणे आवश्यक आहे. संशयित रुग्णांमुळे आपत्तीजनक परिस्थिती सातारा जिल्ह्यात उद्‌भवू नये यासाठी पूर्वतयारी करणे अगत्याचे झाले आहे. कामकाज पूर्ण करण्याकामी अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त मनिषा जवंजाळ यांची जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी नियुक्ती आदेशान्वये केली आहे.

श्रीमती जवंजाळ यांनी पार पाडावयाची जबाबदारी पुढीलप्रमाणे : कोविड-19 संक्रमित रुग्णांची रुग्णालयातील दैनंदिन दाखल संख्येबाबत सर्व हॉस्पीटल प्रशासन यांच्याशी समन्वय ठेवावा. जिल्ह्यातील मेडिकल ऑक्सीजन, रेमिडिसवर इंजेक्शन व अन्य अनुषंगिक औषधांचा तुटवडा भासणार नाही यासाठी तात्काळ नियोजन आखणे. कोविड 19 चे औषधोपचार न मिळाल्याचे कारणाने मृत्यु होणार नाहीत यासाठी औषध वितरण व्यवस्था सुरळीत पार पाडली जाईल याची कटाक्षाने दक्षता घ्यावी. जिल्ह्यात औषधांचा काळाबाजार, अवैध साठेबाजी होणार नाही यासाठी विशेष उपाययोजना राबवाव्यात. कामकाज हे आपल्या स्तरावरुन आवश्यक अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती करुन त्यांच्या सहायाने पार पाडावे, असेही आदेशात जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी नमुद केले आहे.


Back to top button
Don`t copy text!