माणिकराव सोनवलकर यांना यथोचित सन्मान केला जाईल : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर यांचा भाजपा प्रवेश


दैनिक स्थैर्य | दि. 12 ऑगस्ट 2024 | फलटण | शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडून सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याने सातारा जिल्ह्यात भाजपा संघटनेला बळ मिळणार आहे. सोनवलकर यांचा भारतीय जनता पार्टीकडून यथोचित सन्मान केला जाईल असे श्री. बावनकुळे यांनी प्रवेश प्रसंगी सांगितले.

सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर यांनी सोमवारी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत आपल्या अनेक समर्थकांसह भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.

यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, भाजपा प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, माधवी नाईक आदी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!