दैनिक स्थैर्य | दि. ३ जुलै २०२४ | फलटण |
जिल्हाधिकारी कार्यालय सातारा पुरवठा शाखा यांचेतर्फे दि. २५ जून २०२४ रोजी फलटण तालुक्यातील एकूण तीन रास्तभाव दुकानांचा जाहीरनामा काढण्यात आलेला आहे. त्यानुसार १) मानेवाडी (ताथवडा) २) चांभारवाडी ३) गोळेवाडी या गावांकरिता नवीन रास्तभाव दुकानांचा जाहीरनामा निघालेला आहे. या दुकानांसाठी दि. १ जुलै २०२४ ते ३१ जुलै २०२४ अखेर इच्छुक बचतगट, संस्था यांनी तहसिल कार्यालय फलटण (पुरवठा शाखा) येथे अर्ज करावायचे आहेत.
या शासन निर्णयानुसार पंचायती, स्वयंसहायता गट, सहकारी संस्था, महिला बचत गट आदींना प्राधान्य देणेत येईल. यासाठी शासन निर्णयात नमूद केलेप्रमाणे समिती निर्णय घेणार आहे.
याबाबत जाहीरनाम्यामध्ये नमूद केलेप्रमाणे तहसील कार्यालय, फलटण येथून विहीत नमुन्यातील अर्ज प्राप्त करून घेऊन तो परिपूर्ण अर्ज भरून यासोबत आवश्यक कागदपत्रे व प्रतिज्ञापत्रे यांच्यासह तहसील कार्यालय, फलटण पुरवठा शाखा येथे ३१ जुलै २०२४ अखेर इच्छुक संस्थांनी अर्ज करावेत, असे आवाहन तहसील कार्यालय, फलटण यांचेतर्फे करणेत येत आहे.
सदर जाहीरनामा वरील पाच ठिकाणी तलाठी, चावडी आणि तहसील कार्यालय, फलटण यांचे नोटीस बोर्डवर प्रसिध्द करण्यात आला असून तो नीट वाचून यातील अटी शर्तींचे पालन करून याप्रमाणे विहीत मुदतीत अर्ज सादर करावेत, असे आवाहनदेखील तहसील कार्यालय, फलटण यांचेतर्फे करणेत येत आहे.