मुरुम येथे कृषीदूतांकडून ‘आंबा कलम’ प्रात्यक्षिक…!


दैनिक स्थैर्य | दि. १ डिसेंबर २०२४ | फलटण |
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी मान्यताप्राप्त फलटण एज्युकेशन सोसायटीचे कृषी महाविद्यालय, फलटण येथील कृषिदूतांनी ग्रामीण जागरुकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२४/२५ कार्यक्रमाअंतर्गत मुरुम येथे आंबा कलम प्रात्यक्षिक केले.

भोंग अनिल, राठोड आराज, भोंग राहुल, भोसले विश्वजित, पटेल खलील, भोसले सिद्धांत, तेजस गाढवे, कुंभार अनिकेत यांनी केशर आंब्यावर व गावठी आंब्यावर कलम कशी करायची याबद्दल शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले व प्रात्याक्षिक करून दाखवले. यावेळी गावातील काही शेतकरी उपस्थित होते.

कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण सर, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्निल लाळगे सर, प्रा. नीतिशा पंडित मॅडम, समन्वयक प्रा. नीलिमा धालपे मॅडम व प्रो. शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली या विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिक केले.


Back to top button
Don`t copy text!