माणदेशी फौंडेशनची जम्बो कोविड हॉस्पिटलला मदत

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, म्हसवड, दि. 10 : कोरोना रुग्णांना विविध स्तरावर मदत करून माणदेशी फौंडेशन खर्‍या अर्थाने कोरोनायोद्धा ठरत आहे. माणदेशी फौंडेशनने आजपर्यंत 2 कोटी 50 लाखांची भरीव मदत कोरोना  निर्मूलनासाठी केली आहे. सातारा येथे सुसज्ज असे 300 बेडचे कोविड हॉस्पिटल शुक्रवारी प्रशासनाच्या वतीने सुरू झाले आहे.

या जम्बो हॉस्पिटल उभारणीमध्ये माणदेशी फौंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती चेतना सिन्हा आणि माणदेशी चॉम्पियनचे अध्यक्ष प्रभात सिन्हा  यांनी माणदेशी फौंडेशनच्या मदतीने सर्वोतोपारी मदत करून ग्रामीण भागातील व शहरी भागातील रुग्णांना वाचवायचे असे ठरविले. हॉस्पिटलसाठी लागणारी सामग्री देऊ केली. त्यासाठी जम्बो कोविड हॉस्पिटलमध्ये 70 लाखाचे 28 HFNO device हे  हे माणदेशी फौंडेशनकडून देण्यात आले आहे. सातारा जिल्ह्याबरोबरच पुणे येथील ससून रुग्णालयमध्येही आ. रोहित पवार यांच्या हस्ते पीपीई किटचे वाटप करण्यात आले. लॉकडाउनच्या काळात 24 हजार गरजू लोकांना अन्नदान करून भुकेलेल्यांची भूक भागवण्याचे काम माणदेशी फौंडेशनने विविध ठिकाणी केले

गोंदवले खुर्द येथील ग्रामीण रुग्णांसाठी 16 ऑक्सिजन बेड आणि 6आय सी यु बेडचे सुसज्ज कोविड हॉस्पिटल उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. थोड्याच दिवसात हे सुसज्ज कोविड हॉस्पिटल रुग्णांच्या सेवेसाठी सुरू होत आहे

यावेळी माणदेशी फौंडेशनच्या मॅनेजिंग ट्रस्टी श्रीमती रेखा कुलकर्णी यांनी 20 हजार लोकांना रोजच्या दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केल्याचीही माहिती दिली.

माणदेशी फौंडेशनने आजपर्यंत 2 कोटी 50 लाखांची भरीव मदत कोरोना विषाणू निर्मूलनासाठी केली आहे तसेच कोरोनाच्या काळामध्ये सर्वात महत्त्वाचे असते ते म्हणजे धैर्य, घरच्यांचे प्रेम आणि सकस पोषक आहार. कोरोना संक्रमणाच्या काळात हे मिळणे कठीण होऊन बसल्याने, माणदेशी महिला बँक आणि माणदेशी फौंडेशनच्या सर्वेसर्वा श्रीमती चेतना सिन्हा आणि माणदेशी चॅम्पियनचे अध्यक्ष प्रभात सिन्हा यांनी आपल्या तालुक्यातील कोविड सेंटरमध्ये असलेल्या रुग्णांना सकस आहार मिळाला पाहिजे या हेतूने या माणदेशी फौंडेशनतर्फे सर्वांना पोषक आहार, मोसंबी, खजूर, केळी देण्यास सुरुवात  केली.

श्रीमती सिन्हा म्हणाल्या, आज आपण सर्वजण मोठ्या संकटाच्या अनुभवातून जात आहोत. या संकटकाळात आम्ही तुमच्या परिवारासारखे तुमच्यासोबत आहोत. जेवढं काही शक्य आहे ते आम्ही नक्की करू. आपण विश्रांती घ्यावी, चांगल्या आहाराचे सेवन करा आणि लवकर बरे होऊन घरी जावे ही सदिच्छा. या संकट काळात माणदेशी फौंडेशनच्या माध्यमातून मदत करणारे  H.S.B.C. बँक आणि CIPL-  फौंडेशन, इंडस इंड बँक यांचे सातारा जिल्हावासीय कायम ऋणी राहील.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!