दैनिक स्थैर्य । दि. ०७ ऑगस्ट २०२२ । फलटण । मंडल आयोगाच्या पूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात काही प्रस्थापित नेत्यांचेच वर्चस्व होतं. मात्र, या आयोगाच्या अंमलबजावणीनंतर ओबीसीअंतर्गत असलेल्या विविध जातींमधून नेतृत्व पुढे येऊ लागले. गोपीनाथ मुंडे, छगन भुजबळ, महादेव जानकर यांसारखे नेते ओबीसीतून पुढे आले. हे नेते आधीही राजकारणात होतेच, पण ओबीसी नेते ही ओळख या आयोगामुळे त्यांना मिळाली, असे मत ओबीसी जनमोर्चाचे कृष्णाथ उर्फ दादासाहेब चोरमले यांनी स्पष्ट केले.
फलटण येथे मिलिंद नेवसे यांच्या निवासस्थानी मंडल आयोग दिन साजरा करण्यात आला. यावेळी दादासाहेब चोरमले बोलत होते. यावेळी श्रीराम कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, सातारा जिल्हा राष्ट्रवादी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष मिलिंद नेवसे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, वंचित बहुजन आघाडीचे फलटण अध्यक्ष तुकाराम गायकवाड, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष युवराज शिंदे, माळी महासंघाचे दशरथ फुले, भाजपा फलटण तालुकाध्यक्ष बजरंग गावडे, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र भागवत, युवा नेते निवृत्ती खताळ, काँग्रेसचे फलटण कार्याध्यक्ष अमीर शेख, माजी नगरसेवक अजय माळवे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दत्तात्रय शिंदे, पंचायत समिती माजी सभापती शंकर माडकर, राष्ट्रवादी काँग्रेस सातारा जिल्हा अनुसुचित जाती व जमातीचे जिल्हाध्यक्ष सागर कांबळे, बरड ग्रामपंचायतीचे युवा सदस्य व प्रसिद्ध व्यावसायिक शेखर काशीद यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
सत्तेच्या परिघात ओबीसी समाजाचे नेते फारसे नव्हते. काही ठराविक सत्ताधार्यांच्या भोवती सत्ता फिरत होती. मात्र, आधी शिक्षण आणि उद्योगात प्रतिनिधित्व असलेला ओबीसी समाज आरक्षणामुळे सत्तेच्या वर्तुळातही आला. बहुसंख्य ओबीसी हे जातीनिहाय व्यवसायात मर्यादित राहिले होते. माळी, कुंभार, सुतार इत्यादी. आर्थिक स्थिती बरी होती, पण प्रतिष्ठा नव्हती, जी आरक्षणाने दिली, असेही यावेळी दादासाहेब चोरमले यांनी स्पष्ट केले.
वर्गीय राजकारण करणारे सर्व नेते संपले. समाजवादी, साम्यवादी, नक्षलवादी, अतिडावे ते सर्व संपले. कारण वर्गापेक्षा जात वरचढ व्हायला लागली. ओबीसी हा कष्टकरी आणि व्यवसायिक आहे. त्यामुळे तो वर्गीय समाज असला, तरी त्याला मंडल आयोगानं जातीय अंगही दिला, असे मत यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर यांनी स्पष्ट केले.
मोरारजी देसाई हे पंतप्रधान असताना 1 जानेवारी 1979 रोजी मंडल आयोगाची स्थापना करण्यात आली होती. माजी खासदार बिंदेश्वरी प्रसाद मंडल अर्थात बी. पी. मंडल हे अध्यक्षपदी आणि इतर पाच सदस्य असं हे आयोग होतं. या आयोगानं 21 महिन्यांनी म्हणजे पुढच्याच वर्षी 1980 साली अहवाल सादरही केला. व्ही. पी. सिंह पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी 10 ऑगस्ट 1990 रोजी मंडल आयोगाच्या शिफारशींच्या अंमलबजावणीचा निर्णय घेतला, असे यावेळी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते दशरथ फुले यांनी स्पष्ट केले.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष बजरंग गावडे, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र भागवत, वंचितचे तालुकाध्यक्ष तुकाराम गावडे यांच्यासह मान्यवरांची मनोगते व्यक्त केली.
यावेळी उपस्थित बांधवानी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण केली.
यावेळी प्रसिद्ध विधिज्ञ ॲड. ऋषिकेश काशीद, राजाभाऊ काळे, किशोर तारळकर, महादेव पोकळे, शंकर अडसुळ, ताजुद्दीन बागवान, रघुनाथ कुंभार, बापुसाहेब राऊत, तुकाराम शिंदे, नानासाहेब ईवरे, गणेश शिरतोडे, ॲड. बापुराव सरक, बाळासाहेब भोंगळे, आसिफ मेटकरी (बाळासाहेब), दिपक जाधव, हेमंत ननावरे, संदीप नाळे, सोहेल मणेर, जमीर आतार, मुनित इनामदार, हाजी निजामभाई आतार, गणपत जाधव, डी. वाय. शिंदे, शरद कोल्हे, अभिजीत जानकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.