माण – खटावचे युवा नेते रणजित देशमुख यांची कोल्हापूर महानगरपालिका निवडणूकीसाठी निरीक्षक पदी निवड


स्थैर्य, वडुज (सुयोग लंगडे) : काँग्रेस पक्ष राज्यात पक्ष मजबूत करण्यासाठी ताकदीने उतरला आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीसाठी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने उत्कृष्ट नियोजन केलेले आहे. आगामी कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक निरीक्षक म्हणून सातारा जिल्ह्यातील माण – खटाव तालुक्याचे काँग्रेस पक्षाचे युवा नेते रणजीत देशमुख यांची निवड केली आहे. तसेच त्यांच्या सोबत पुणे शहरातील काँग्रेस नेते अभय छाजेड यांची पण निवड केली आहे.

रणजित देशमुख यांना काँग्रेस राज्यस्तरीय निवडणूक कमिटी मध्ये पण पक्षाने स्थान दिलेले आहे. रणजित देशमुख माध्यमांशी बोलताना म्हणाले काँग्रेस मध्ये प्रवेश केल्यानंतर माझ्यावर शिक्षक आणि पदवीधर निवडणूकीची जबाबदारी दिली होती. ती मी यशस्वी पध्दतीने पार पाडली. नंतर मला राज्यस्तरीय काँग्रेस निवडणूक कमिटी मध्ये स्थान दिले. आता आगामी कोल्हापूर महानगरपालिका निवडणूकीसाठी निरीक्षक पदी निवड केली असून ती जबाबदारी सुध्दा यशस्वी रित्या पार पाडून कोल्हापूर महापालिकेवर काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


Back to top button
Don`t copy text!