जुगार अड्डयावर छापा, एकास अटक 

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›
स्थैर्य, सातारा, दि.२६: सातारा येथे एका दुकान गाळ्याच्या वरील गॅलरीत मटका जुगार खेळत असणार्‍या गाळ्यात सातारा शहर पोलिसांनी कारवाई करून एकाला अटक केली. त्याच्याकडून 660 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
याबाबत माहिती अशी, न्यु मॅट्रो वॉच सेंटर या गाळ्याच्या वरील गॅलरीमध्ये एकजण कल्याण नावचा मटका जुगार चालवत असल्याची खात्रीशीर माहिती शहर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याठिकाणी छापा टाकला. पोलिसांची चाहुल लागताच समोर उभा असलेला इसम पळुन गेला तर खाली बसलेल्या इसमास पोलिसांनी जागीच पकडले. त्याची चौकशी केली असता संबंधिताचे नाव सलिम इब्राहीम शेख वय 59 रा. 15, रविवार पेठ, सातारा असून तो त्याचा मालक यासीन ईक्बाल शेख रा. नकाशपुरा पेठ, सातारा याच्या सांगण्यावरुन कल्याण मटका चालवित असल्याचे सांगितलेने. पोलिसांनी त्याची अंगझडती घेूवन मटक्याचे साहित्य आणि 660 रुपयांची रोकड असा मुद्देमाल जप्त केला. यप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!