
दैनिक स्थैर्य । 4 जून 2025। फलटण । सोनवडी खुर्द, ता. फलटण येथील रविराज लक्ष्मण पोळ (वय 27) याने हाताची नस कापून आत्महत्या केली. याबाबतची फिर्याद नवनाथ विठ्ठल पवार (रा. सोनवडी खुर्द) याने फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला दिली.
पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मंगळवारी सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास फलटणला जातो असे सांगून रविराज पोळ निघून गेला. त्यानंतर गावातील सोपान सूर्यवंशी यांनी फोनवर सांगितले की, तुमच्या भाच्याने तुकाई मंदिरासमोर हाताची नस कापून घेतली व मोठ्याप्रमाणात रक्त येत आहे. त्यानंतर तेथे जावून त्याला उपचारासाठी फलटण येथील स्पंदन हॉस्पिटल येथे आणले. परंतु उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.
रविराज हा व्यसनी होता. तो फाईनेस कंपनीत कामास होता. त्याठिकाणी त्याला कामास ब्रेक दिला होता. याअगोदरही विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. अधिक तपास पोलीस नाईक महाडिक करत आहेत.