स्थैर्य, दि.१०: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी दुपारी दीड वाजता नंदीग्राम मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. नावनोंदणी होण्याआधी आपली ताकद दाखवण्यासाठी त्यांनी हल्दियामध्ये एक किलोमीटर लांब रोड शो केला, जिथे हजारो टीएमसी कार्यकर्ते हजर होते. तत्पूर्वी ममता या नंदीग्रामच्या एका शिवमंदिरात पूजेसाठी आल्या. येथे त्यांनी भगवान शिव यांचा जलाभिषेक केला.
यापूर्वी मंगळवारी ममतांनी नंदीग्राममध्ये आपल्या कार्यकर्त्यांची भेट घेतली. त्या म्हणाल्या की नंदीग्राम किंवा सिंगूर येथून निवडणूक लढवण्याचा विचार पहिले केला होता. भाजपच्या हिंदू कार्डावर हल्ला चढवताना त्या म्हणाल्या की, ‘माझ्याबरोबर हिंदू कार्ड खेळू नका, मीसुद्धा एक हिंदू आहे आणि मी चंडी पाठ करून घराबाहेर पडते.’ त्याचवेळी केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी ममतांवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की बंगालमधील रोहिंग्यांबरोबर ममता दीदीही चिंताग्रस्त आहेत. आता मंदिरात जावे की, मशिदीत हे त्यांना कळत नाहीये.
भावनिक कार्ड देखील खेळले
ममतता म्हणाल्या होत्या की, नंदीग्रामच्या लोकांनी नकार दिला तर मी येथून निवडणूक लढणार नाही. येथे विभाजित करण्याचा प्रयत्न केला जाईल, परंतु आपल्याला अशा लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करावे लागेल. ममतांनी मंचावरच चंडीपाठ केला होता.
अधीर रंजन यांनी ममतांवर निशाणा साधला, म्हणाले – दीदी यांना भाजपची भीती
कॉंग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी ममता बॅनर्जी यांना लक्ष्य केले आहे. ते म्हणाले की ममता बॅनर्जी यांना भाजपची भीती वाटते. त्यांना प्रथमच स्वत: ला ब्राह्मण असल्याचे सिद्ध करावे लागत आहे. पूर्वी दीदी म्हणायच्या की मी मुस्लिमांचे रक्षण करते, हिजाब घालते पण आता त्यांचा दृष्टीकोन बदलला आहे. त्या आजकाल चंडी पठण करत आहे. चौधरी म्हणाले की, बंगाल निवडणुकीत राहुल गांधी आणि प्रियांका गांधीही प्रचार करतील.
ममतांचा सामना शुभेंदुंसोबत
विधानसभा निवडणुकीत ममता यांचा सामना त्यांचे निकटवर्तीय राहिलेल्या शुभेंदू अधिकारीसोबत आहे. शुभेंदू यांनी तृणमूल कॉंग्रेसचा हात सोडला आणि भाजपमध्ये प्रवेश केला. शुभेंदू 12 मार्च रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यापूर्वी ते नंदीग्राममधील आपल्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन करतील.
बंगालमध्ये 8 टप्प्यांमध्ये निवडणूक
पश्चिम बंगालमधील एकूण 294 विधानसभा जागांसाठी यावेळी 8 टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. 294 जागा असलणाऱ्या विधानसभेसाठी 27 मार्च (30 जागा), 1 एप्रिल (30 जागा), 6 एप्रिल (31 जागा), 10 एप्रिल (44 जागा), 17 एप्रिल (45 जागा), 22 एप्रिल (43 जागा), 26 एप्रिल ( 36 जागा) 2 एप्रिलला ( 35 जागा) ला मतदान होणार आहे. मतमोजणी 2 मे रोजी होईल.