माळशिरस, नातेपुते, सदाशिवनगर पंचक्रोशीतील ‘बीआरएस’ पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा खासदार रणजितसिंह यांना पाठिंबा


दैनिक स्थैर्य | दि. २८ एप्रिल २०२४ | फलटण |
माळशिरस, नातेपुते, सदाशिवनगर पंचक्रोशीतील ‘बीआरएस’ पक्षातील विविध सेलच्या पदाधिकार्‍यांनी विकासकामांना साथ देत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विजयासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत.

माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक येत्या ७ मे रोजी होत आहे. यासाठी भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे. विजयासाठी नातेपुते, माळशिरस, सदाशिवनगर पंचक्रोशीतील भाजपच्या निष्ठावंतांनी सुरूवातीपासून विजयासाठी कंबर कसली आहे, तर आता ‘बीआरएस’च्या विविध पदाधिकार्‍यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कार्य तसेच खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केलेली विकासकामे पाहून देशात भाजपचेच सरकार येणार असून पुन्हा एकदा नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार आहेत. यामुळे बीआरएस तालुकाध्यक्ष अशोक भोसले व ओबीसी सेलचे अध्यक्ष शंकरराव बनकर यांनी शनिवारी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पाठिंबा दिला.

यावेळी त्यांचे स्वागत फलटण शहर भाजपाध्यक्ष अनुप शहा, नगरसेवक अजय माळवे, सुधीर अहिवळे, फलटण शहर वैद्यकीय आघाडीचे अध्यक्ष डॉ. अनिल श्रीवास्तव यांनी त्यांचे स्वागत करून आभार मानले.


Back to top button
Don`t copy text!