दैनिक स्थैर्य | दि. ९ फेब्रुवारी २०२५ | फलटण |
मंगळवार, दि. ११ फेब्रुवारी २०२५ पासून सुरू होणार्या इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेची कला शाखेची बैठक व्यवस्था फलटण येथील मालोजीराजे शेती विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, जिंतीनाका, फलटण (केंद्र क्रमांक ०१०२) या ठिकाणी करण्यात आली असल्याची माहिती केंद्रसंचालक प्रा. देशमुख डी. एम. यांनी दिली.
फलटण तालुक्यातील कला शाखेतील सरदार वल्लभाई हायस्कूल, साखरवाडी, मुधोजी हायस्कूल उच्च माध्यमिक विद्यालय फलटण, छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज गिरवी, सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूल व ज्युनि. कॉलेज फलटण, फलटण हायस्कूल, फलटण, जय भवानी हायस्कूल, तिरकवाडी, सरस्वती माध्यमिक विद्यालय बिबी, हनुमान माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, गोखळी, प्रेमलाताई चव्हाण हायस्कूल, फलटण या ठिकाणी ज्युनिअर कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या व बोर्ड परिक्षा क्रमांक X०६८८९८ ते X०६९२८२ व X०४००२१५ असणार्या विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था मालोजीराजे शेती विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, जिंती नाका, फलटण येथे करण्यात आलेली आहे .
बैठक व्यवस्थेसंबंधी कोणती अडचण असल्यास केंद्रसंचालक प्रा. देशमुख डी. एम.,(मो.नं. ८६००४०३६८८) उपकेंद्रसंचालक प्रा. बनकर ए.डी. ( मो .नं. ९८६०३०५८९०), प्रा. धुमाळ एस. के., प्रा. तरटे व्ही. बी. यांच्याशी संपर्क करण्याचे तसेच कॉपीमुक्त अभियान राबवण्यासाठी व परीक्षा निकोप वातावरणात पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केंद्र ंचालक प्रा. देशमुख डी. एम. यांनी केले आहे.