स्थैर्य, सातारा, दि. 6 : मल्हारपेठ, सातारा येथे अज्ञात चोरट्याने मोबाईल चोरीस गेल्याप्रकरणी सातारा शहर पोलिसात अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत सौ. मनीषा नितीन कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांची मुलगी वापरत असलेला 7 हजार 500 रुपयांचा मोबाईल दि. 2 रोजी दुपारी अडीच ते पावणे तीनच्या सुमारास अज्ञात चोरट्याने चोरून नेला आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल झाला असून हवालदार सणस तपास करत आहेत.