
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. २४ नोव्हेंबर २०२१ । फलटण । कोरोनासारख्या महाभयंकर काळामध्ये सुद्धा युवा नेते श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांनी पायाला भिंगरी लावून तालुका पिंजून काढला. कोरोना काळामध्ये सर्व नेतेमंडळी भीत असताना श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांनी भीती न बाळगता तालुक्यामधील नागरिकांच्या मनामध्ये असलेली भीती दूर करण्याचे काम श्रीमंत विश्वजितराजेंनी केलेले होते, अश्या सर्व गोष्टी लक्षात घेता श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांना पंचायत समितीच्या सभापती पदी काम करण्याची संधी द्यावी, अशी मागणी श्रीमंत रामराजे प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आलेली आहे.
