दैनिक स्थैर्य । दि. २४ नोव्हेंबर २०२१ । फलटण । श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या पंचायत समितीच्या सभापती पदी युवा नेते श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांची निवड करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते बु. गणेश अहिवळे मित्रमंडळाच्या वतीने प्रशांत अहिवळे (बारीक) यांनी केलेली आहे.
श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांची फलटण तालुक्यामधील युवकांच्यामध्ये प्रचंड क्रेझ असून फलटण तालुक्यातील बहुतांश युवा वर्ग हा श्रीमंत विश्वजितराजे यांचा चाहता आहे. फलटण शहरांमध्ये बु. गणेश अहिवळे यांचा मित्र वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. बु. गणेश अहिवळे मित्र मंडळाचे प्रमुख म्हणून सध्या प्रशांत अहिवळे (बारीक) हे कार्यरत आहेत. तरी फलटण शहरातील बु. गणेश अहिवळे यांच्या मित्र मंडळाच्या वतीने प्रशांत अहिवळे यांनी श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांना सभापती करावी अशी आग्रही मागणी केलेली आहे.