श्रीमंत विश्वजितराजेंना सभापती करा; माजी सभापती दत्तात्रय गुंजवटे यांची मागणी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २५ नोव्हेंबर २०२१ । फलटण । फलटण तालुक्यातील युवकांचे आशास्थान व पंचायत समिती सदस्य श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांना रिक्त झालेल्या फलटण पंचायत समितीच्या सभापती पदी काम करण्याची द्यावी, अशी मागणी फलटण पंचायत समितीचे माजी सभापती दत्तात्रय गुंजवटे यांनी केलेली आहे.

विधान परिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर व सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली मला पंचायत समितीच्या सभापती पदी कामकाज करण्याची संधी मिळालेली होती. फलटण तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित राजे गटाला मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. फलटण तालुक्यामध्ये युवकांचे संघटन मजबूत करण्यासाठी युवा नेते श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांना पंचायत समितीच्या सभापती पदी काम करण्याची संधी देण्यात यावी, अशी मागणी माजी सभापती दत्तात्रय गुंजवटे यांनी केलेली आहे.

फलटण तालुक्यामध्ये श्रीमंत विश्वजितराजेंचा युवकांमध्ये दांडगा जनसंपर्क आहे. तरी फलटण तालुक्यातील युवकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी श्रीमंत विश्वजितराजे हे नेहमीच कार्यरत असतात. श्रीमंत विश्वजितराजेंच्या रूपाने फलटण पंचायत समिती विविध क्षेत्रात भरीव कामगिरी करेल यात कोणालाही कसलीही शंका असण्याचे कारण नाही, असे हि दत्तात्रय गुंजवटे यांनी यावेळी स्पष्ट केले.


Back to top button
Don`t copy text!