
दैनिक स्थैर्य । दि. २४ नोव्हेंबर २०२१ । फलटण । फलटण तालुक्याचे युवा नेते व पंचायत समिती सदस्य श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांना फलटण पंचायत समितीच्या सभापतीपदी काम करण्याची संधी द्यावी अशी मागणी श्रीमंत रामराजे युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष राहुल निंबाळकर यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केलेली आहे.
याबाबत माहिती देताना राहुल निंबाळकर म्हणाले आहेत कि, श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांची सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदी बिनविरोध निवड झाल्यानंतर त्यांनी सभापती पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे रिक्त झालेल्या सभापती पदावर युवा नेते श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांना कामकाज करण्याची संधी देण्यात यावी. श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांचा फलटण तालुक्यामध्ये दांडगा जनसंपर्क आहे. युवा कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांदा लावून श्रीमंत विश्वजितराजे काम करीत असतात. तालुक्यातील कोणताही युवक कसल्याही अडचणीत आला तरी त्याच्या मदतीस श्रीमंत विश्वजितराजे हे पहिल्या हाकेला धावून जातात. ह्या सर्व गोष्टींचा विचार करता श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांना फलटण पंचायत समितीच्या सभापतीपदी काम करण्याची संधी देण्यात यावी.