स्थैर्य, फलटण दि. ६ : महाराट्रातील शेतकरी बांधवाना शेतीसाठी लागणारी खते अधिक सहजरित्या उपलब्ध होण्यासाठी माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केंद्रीय जलवाहतूक आणि उर्वरक राज्यमंत्री ना. मनसुखलाला मंडविया यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन दिले. तसेच अर्थसंकल्पामध्ये शेतकर्यांच्या हितासाठी उर्वरक मंत्रालयाकडून शक्यतोपरी सर्व मदत करावी अशी मागणी केल्यानंतर आवश्यक ती सर्व मदत केंद्र सरकार करेल असे आश्वासन केंद्रीय जलवाहतूक आणि उर्वरक राज्यमंत्री ना. मनसुखलाला मंडविया यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना दिले.