दैनिक स्थैर्य | दि. २६ जून २०२३ | कोल्हापूर |
दापोली कृषी महाविद्यालयातील एन.सी.सी. कॅडेटने कर्दे बिच येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला. या कार्यक्रमासाठी कोल्हापूर एन.सी.सी. हेडक्वॉटरचे ग्रुप कमांडर ब्रिगेडियर अभिजित वाळिंबे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमासाठी १९ महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी. कराडचे कर्नल दिनेश झा, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रमोद सावंत सर, सहयोगी राष्ट्रीय छात्रसेना अधिकारी लेफ्ट. डॉ. हेमंत बोराटे, वनशास्त्र विद्यालयाचे एन.सी.सी. युनिटचे सी.टी.ओ. विश्वदीपक त्रिपाठी, १९ महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी. कराडचे हवालदार सचिन जगदाळे यांची यावेळी उपस्थिती होती.
या कार्यक्रमात माजी एन.सी.सी. कॅडेट ज्ञानेश्वरी चाटे हिने योगा प्रात्यक्षिके केली. या कार्यक्रमामध्ये एन.सी.सी. कॅडेट कृषी महाविद्यालय दापोली, वनशास्त्र विद्यालय दापोली आणि एन.के. बराडकर कॉलेज ऑफ आर्ट अँड सायन्स दापोली हे सहभागी झाले होते. हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यात हॉटेल सागर सावली ग्रॅण्डचे मालक मंगेश मोरे, सागर मोरे आणि सर्व कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
ब्रिगेडियर अभिजित वाळिंबे यांनी विविध स्पर्धा परीक्षांबाबत एन.सी.सी. कॅडेटला मार्गदर्शन केले. विद्यार्थ्याने आपल्या ध्येयावर लक्ष कसे केंद्रित करायला हवे आणि एक जबाबदार नागरिक म्हणून समाजात कसे वावरले पाहिजे, याबद्दल वाळिंबे यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर ब्रिगेडियर वाळिंबे यांनी कृषी महाविद्यालयातील एन.सी.सी. युनिटला भेट देऊन आढावा घेतला व एन.सी.सी. युनिट, कृषी महाविद्यालय दापोली हे संपूर्ण कोल्हापूर ग्रुपमधील सर्वोत्तम एन.सी.सी. युनिट बनू शकते, असे गौरवोद्गार काढले.