
दैनिक स्थैर्य । दि. १६ डिसेंबर २०२२ । फलटण । श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय, फलटण व कृषि महाविद्यालय, फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात जागतिक मृदा आरोग्य दिनाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर यांनी माती टिकविणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन केले. दिनांक 5 डिसेंबर 2022 रोजी जागतिक मृदा आरोग्य दीन साजरा करण्यात येतो. जागतिक मृदा आरोग्य दिनाचे औचित्य साधुन श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय, फलटण व कृषि महाविद्यालय, फलटण येथे जागतिक मृदा आरोग्य दिना निमित्त तज्ञांचे मार्गदर्शन व महाविद्यालयातील प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचे पोस्टर प्रेझेंटेशन आयोजित करण्यात आले.
सदर कार्यक्रमामध्ये श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय, फलटण व कृषि महाविद्यालय, फलटण येथील प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांनी जागतिक मृदा आरोग्य दिनाचे महत्व याबद्दल मनोगत व्यक्त केले तसेच जमिनीचे धुप होण्याची कारणे या विषयावर विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमा दरम्यान डॉ. जी. बी. अडसूळ, सहायक प्राध्यापक, विस्तार शिक्षण विभाग यांनी माती व पाणी परीक्षनाचे महत्व, प्राथमिक व दुय्यम अन्नद्रव्यांचे महत्व व जागतिक मृदा आरोग्य दिनाचे महत्व या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रा. ए.ए. शिंदे, सहायक प्राध्यापक, मृदा शास्त्र विभाग यांनी जमिनीचे सुपिकता राखणे, जमिनीचे नैसर्गिक संतुलन, माती प्रदूषणाची कारणे, माती परीक्षणानुसार शिफारशीत खतमात्रा या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्षिय मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉ. एस.डी. निंबाळकर यांनी ग्लोबल वॉर्मिगचे कारणे, जमिनीची धूप होण्याची कारणे, जमिनीचे आरोग्य बिघडण्याची कारणे, खते कीटकनाशकांमुळे जमिनीचा खालवलेला पोत, नापिक जमिन होण्याची कारणे, लागवडीयोग्य जमिनीचे महत्व, जमिनीचे आरोग्य टिकविण्याचे आव्हान या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यानंतर महाविद्यालयातील प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांनी जागतिक मृदा आरोग्य दीन निमित्त पोस्टर प्रेझेंटेशन केले. सदरील पोस्टर प्रेझेंटेशनसाठी महाविद्यालयातील प्रथम वर्षातील एकूण 30 विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन पोस्टर बद्दल सविस्तर माहिती दिली.
सदरील जागतिक मृदा आरोग्य दिनानिमित्त सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.डी. निंबाळकर यांनी अभिनंदन केले व विद्यार्थ्यांनी वैयक्तिक कलागुण विकसित करण्यासाठी आवाहन केले. सदरील कार्यक्रमासाठी मृदा शास्त्र विभागाचे प्रा. अश्विनी ससाणे, डॉ. प्राजक्ता खरात व प्रा. गणेश शिंदे उपस्थित होते.