सामाजिक बांधिलकी जपल्याने जीवनात आनंद निर्माण होतो : रमेश बाबर

फेरेरो कामगारांच्या वतीने दिवाळी भेट

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

 

दैनिक स्थैर्य | दि. ८ नोव्हेंबर २०२३ | बारामती |
जीवनात फक्त पैसा महत्त्वाचा नसून सामाजिक बांधिलकी महत्त्वाची आहे. त्यामुळे जीवनात आनंद व वात्सल्य निर्माण होत असल्याचे प्रतिपादन ‘इमसोफर एम्प्लॉईज युनियन’ (फेरेरो) चे अध्यक्ष रमेश बाबर यांनी केले.

श्रावण बाळ आश्रम राममंदिर इंदापूर, जिल्हा पुणे आणि हरी ओम बालगृह टाकळी-खंडेश्वरी, बाभुळगाव, तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर या बालगृहांमध्ये अनाथ, निराधार, लोककलावंत, ऊसतोड कामगार, वीटभट्टी कामगार, अशा एकूण २५० मुला-मुलींचे संगोपन, शिक्षण लोक सहभागातून केले जाते. त्यांना फेरेरो कामगार युनियन यांच्या कडून ‘दिवाळी भेट’ म्हणून विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, गणवेश व क्रीडा साहित्य आणि मिठाई वाटप करण्यात आली.

याप्रसंगी बारामती एमआयडीसी येथील इमसोफर मॅन्युफॅक्चरिंग एम्प्लॉईजचे युनियन अध्यक्ष रमेश (नाना) बाबर, सचिव अमोल पवार, उपाध्यक्ष संदिपकुमार बिचकुले, कार्याध्यक्ष प्रविणकुमार थोरात, खजिनदार चंद्रशेखर नाळे, सहसचिव आनंदकुमार जाधव, सहखजिनदार सचिन पिंगळे, सदस्य संतोष पवार, भाग्यश्री माने, लक्ष्मी धेंडे, रमोला आवाळे आदी मान्यवर उपस्थित होते.

अनाथाच्या जीवनात रंग भरण्यासाठी कर्मचार्‍यांनी एकत्र येऊन दिवाळी गोड केल्याबद्दल विद्यार्थ्यांनी व संस्था चालक यांनी ‘फेरेरो’ परिवाराचे आभार व्यक्त केले.


Back to top button
Don`t copy text!