
स्थैर्य, फलटण, दि. २१ ऑगस्ट : सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या लायन्स क्लब ऑफ फलटणच्या अध्यक्षपदी लायन महेश साळुंखे यांची निवड करण्यात आली आहे. क्लबच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ नुकताच मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.
या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून लायन्सचे माजी डिस्ट्रीक्ट गव्हर्नर डॉ. दीपक शहा, भोजराज नाईक निंबाळकर आणि प्राचार्य डॉ. राजेंद्र शहा उपस्थित होते. नूतन अध्यक्ष महेश साळुंखे यांच्यासह सचिवपदी निखिल सोडमिसे आणि खजिनदारपदी स्वप्निल सोडमिसे यांनी पदभार स्वीकारला. डॉ. दीपक शहा यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना शपथ देऊन त्यांच्या कार्याची माहिती दिली व शुभेच्छा दिल्या.
यावेळी क्लबमध्ये नव्याने दाखल झालेल्या सदस्यांचा शपथविधी सोहळा भोजराज नाईक निंबाळकर यांच्या हस्ते पार पडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंगेश दोशी यांनी केले.
या पदग्रहण सोहळ्यासाठी रिजन चेअरमन नीलम लोंढे पाटील, झोन चेअरमन जगदीश करवा, पांडुरंग शिंदे, खुशवंत जाधव, प्रभाकर आंबेकर, मिलिंद शहा, जगदीश पुरोहित यांच्यासह क्लबचे आजी-माजी पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.