महाराष्ट्र हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदी महेश खुटाळे यांची निवड

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २९ डिसेंबर २०२३ | फलटण |
स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडिया अंतर्गत दि. ६ ते ११ जानेवारी २०२४ या कालावधीमध्ये जालंधर (पंजाब) येथे आयोजित करण्यात आलेल्या शालेय १९ वर्षाखालील राष्ट्रीय हॉकी स्पर्धेमध्ये भाग घेणार्‍या महाराष्ट्राच्या हॉकी संघाचे प्रशिक्षक म्हणून फलटण तालुक्याचे सातारा जिल्ह्यातील ज्येष्ठ हॉकी प्रशिक्षक महेश खुटाळे यांची नियुक्ती करण्यात आली.

या स्पर्धेचे पूर्व प्रशिक्षण शिबिर नांदेड येथे दिनांक ३१ डिसेंबर २०२३ ते ३ जानेवारी २०२४ या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आलेले आहे. दि. ४ जानेवारी २०२४ रोजी महाराष्ट्राचा संघ नांदेडहून राष्ट्रीय स्पर्धेसाठी जालंधर (पंजाब) येथे रवाना होणार असून दिनांक ६ ते ११ जानेवारी दरम्यान होणार्‍या राष्ट्रीय हॉकी स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचा संघ सहभागी होईल.

महेश खुटाळे सर यांची महाराष्ट्र संघाच्या प्रशिक्षकपदी निवड झाल्याबद्दल विधान परिषदेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फलटण-कोरेगांव मतदारसंघाचे आमदार श्री. दीपक चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र खो – खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटीच्या क्रीडा समितीचे चेअरमन शिवाजीराव घोरपडे, सदस्य महादेव माने, युवा उद्योजक तुषार नाईक निंबाळकर, मुधोजी हायस्कूलचे प्राचार्य बाबासाहेब गंगवणे, हॉकी प्रशिक्षक सचिन धुमाळ, बी. बी. खुरंगे, कु. धनश्री क्षीरसागर, माजी राष्ट्रीय खेळाडू शिरीष वेलणकर, सुजित निंबाळकर तसेच दि हॉकी सातारा संघटनेचे अध्यक्ष बहुबली शहा, प्रवीण गाडे, महेंद्र जाधव, सचिन लाळगे, अमोल नाळे इत्यादी मान्यवरांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


Back to top button
Don`t copy text!