
दैनिक स्थैर्य । 14 मे 2025। फलटण । सातारा जिल्हास्तरीय दिशा समितीच्या सदस्य पदी राष्ट्रीय कांग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष महेंद्र (बबलू) सूर्यवंशी – बेडके यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्हास्तरीय दिशा समितीचे अध्यक्षपदी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आहेत. सहअध्यक्ष म्हणून खासदार धैर्यशील मोहिते -पाटील हे कामकाज बघत आहेत. जिल्हास्तरीय दिशा समितीचे सचिव म्हणून जिल्हाधिकारी आहेत. जिल्हास्तरीय सर्व विभागाचे प्रमुख हे समितीचे सदस्य आहेत.
केंद्र शासनाच्या माध्यमातून राबवण्यतात येणार्या सर्व योजनांच्या देखरेखीसाठी दिशा समिती कार्यरत आहे.
महेंद्र सूर्यवंशी यांच्या निवडीमुळे फलटण तालुक्यातील केंद्र शासनाच्या विविध विकासकामे आता गतिशील होतील.