
भगवान महावीर जयंतीचे औचित्य साधून फलटण-कोरेगाव मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील व नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटण येथील महावीर स्तंभास अभिवादन केले. यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्थैर्य, फलटण, दि. ३१ मार्च : भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त फलटण शहरात विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करून जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या जयंतीचे औचित्य साधून फलटण-कोरेगाव मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील आणि फलटण नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटण येथील ‘महावीर स्तंभावर’ जाऊन भगवान महावीरांना विनम्र अभिवादन केले.
जैन धर्माचे तीर्थंकर भगवान महावीर यांनी जगाला शांती, अहिंसा आणि करुणेचा संदेश दिला. त्यांच्या याच विचारांचे स्मरण आज जयंतीनिमित्त करण्यात आले.
आमदार सचिन पाटील आणि नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी दर्शन घेऊन उपस्थितांना भगवान महावीर जयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
या अभिवादन प्रसंगी भगवान महावीर जयंती उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी, मान्यवर आणि जैन समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

