महाविकासआघाडीचे पदवीधर आमदार ॲड. अभिजित वंजारी कोरोना पॉझिटिव्ह

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, नागपूर, दि.१३: नागपूर पदवीधर मतदारसंघातील महाविकासआघाडीचे
नवनिर्वाचित आमदार ॲड. अभिजित वंजारी यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने
इस्पितळात उपचारार्थ दाखल झाले आहे. विशेष म्हणजे त्यांचे प्रतिस्पर्धी
महापौर संदीप जोशी यांनासुद्धा करोनाची लागण झाली आहे.

अभिजित वंजारी यांनी नुकतीच आमदारकीची शपथ घेतली आहे. १४ डिसेंबरपासून सुरू
होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात ते सहभागी होणार होते. मात्र, त्यांना पहिल्याच
अधिवेशनाला करोनामुळे मुकावे लागणार आहे. विशेष अधिवेशनासाठी सर्व
आमदारांना कोरोना चाचणी करणे बंधनकारक केले आहे. सुमारे महिनाभर ते
निवडणुकीच्या प्रचारात होते.

यानिमित्त त्यांना पूर्व विदर्भातील सहा जिल्हे
पालथे घातले. या दरम्यान झालेल्या गाठीभेटी आणि शपथविधीसाठी त्यांनी
मुंबईचे वारी केली. कोणाच्या तरी संपर्कातून त्यांना कोरोनाची लागण झाली
आहे. थोडा ताप आल्याने त्यांनी कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह
निघाली.

संदीप जोशींना केले होतो पराभूत

नागपूर पदवीधर मतदारसंघातून महाविकासआघाडीचे उमेदवार
अभिजित वंजारी तब्बल १८,७१० मतांनी निवडून आले होते. अभिजित वंजारी यांना
६१,७०१ मते मिळाली होती. तर त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे संदीप जोशी यांना
४२,९९१ मते मिळली. अभिजित यांच्या राजकीय कारकीर्दीमधील पहिलाच विजय आहे.
यापूर्वी त्यांनी दोन विधानसभा निवडणुका, एक महापालिका निवडणूक लढविली
होती. मात्र, त्यामध्ये त्यांना अपयश आले होते.

पहिल्या निवडणुकीत झाले होते पराभूत

अभिजित वंजारी यांचा जन्म १० मे १९७३ रोजी झाला.
त्यांनी नागपुरातून माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी एलएलबी
केले. त्यांनी महाविद्यालयीन जीवनात १९८८ ते २००२ पर्यंत या काळात
एनएसयुआयचे जनरल सेक्रेटरी म्हणून काम पाहिले. अभिजित वंजारी यांचे वडील
गोंविदराव वंजारी आमदार होते. त्यामुळे त्यांनी पहिल्यांदा काँग्रेसचे
उमेदवारीवर महापालिका निवडणूक लढविली. मात्र, त्यात त्यांना अपयश आले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!