पुणे पदवीधर मधून महाविकास अगदीच उमेदवार निवडून आणायचा आहे का ?; फलटण तालुका शिवसेनेचे शिष्टमंडळ भेटणार शरद पवारांना

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, फलटण, दि.१९ : शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष सन्माननीय शरदचंद्रजी पवार व काँग्रेस पक्षाचे नेते सन्माननीय राहुलजी गांधी यांनी दूरदृष्टीने सर्व अनुकुल प्रतिकुल बाजुंचा अभ्यास करून भाजपला बाजुला ठेवून एकत्र येत महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले व ते दमदारपणे चालवले आहे. पुणे पदवीधर निवडणुकीसाठी उभे असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार अरुण गणपती लाड यांच्या प्रचारार्थ फलटण शहरात पदवीधर संवाद मेळावा आज दिनांक 18/11/2020 रोजी आयोजित करण्यात आला होता. परंतु फलटण तालुक्यातील जनतेच्या प्रत्येक समस्येवर संघर्ष करुन जनतेच्या समस्या सोडवण्यात अग्रभागी असलेल्या फलटण तालुक्यातील शिवसेना पक्षाशी मेळाव्यास उपस्थित राहणेसंबंधी कोणताही संवाद साधण्यात आला नाही. महाविकास आघाडी आपल्याच आघाडीतील महत्वाच्या घटक पक्षाशी संवाद साधु शकत नाही, तर मग मतदारांशी कसा संवाद साधणार ? अशा कडवट प्रतिक्रिया फलटण तालुक्यातील शिवसैनिकांकडुन येत असल्याचे शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे, दुसरे तालुका प्रमुख स्वप्निल मुळीक, शहरप्रमुख रणजित कदम यांनी सांगितले.

महाराष्ट्र जनतेच्या हिताचे व महाविकास आघाडीसाठी पोषक असलेले निर्णय सकारात्मकपणे तीनही पक्ष एकत्रित घेत आहेत. महाराष्ट्र राज्यातील पदवीधर निवडणुकीतही शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस या तीनही पक्षांनी एकमत करत एकत्रित महाविकास आघाडीतच निवडणुका लढवण्याचा योग्य व सकारात्मक निर्णय घेतला आहे. 

यावर शिवसेनेचे एक शिष्टमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब व शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांना भेटुन महाविकास आघाडीचा उमेदवार निवडुन आणायचा आहे की पाडायचा आहे ? यासंबंधी भेटुन विचारणा करणार असल्याचे शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे, दुसरे तालुका प्रमुख स्वप्निल मुळीक व शहरप्रमुख रणजित कदम यांनी सांगितले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!