
दैनिक स्थैर्य । 12 एप्रिल 2025 । फलटण । फलटण येथे महात्मा ज्योतिबा फुले जयंतीच्या निमित्ताने जेष्ठ नेते तथा आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, युवा नेते श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, माजी विरोधी पक्ष नेते समशेरसिंह नाईक निंबाळकर, फलटण पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर, युवा नेते महेंद्र सूर्यवंशी – बेडके यांच्यासह भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष यांच्यासह विविध संघटनांनी महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन केले व आदरांजली अर्पण केली.
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने फलटण येथे भव्य सायकल रॅली व भव्य – दिव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी फलटण शहरासह तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी महात्मा फुले जयंती उत्सव समितीच्या वतीने उभारण्यात आलेल्या सेल्फी पॉईंटवर सर्वच मान्यवरांच्यासह सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही.