दैनिक स्थैर्य | दि. १९ जुलै २०२४ | फलटण |
श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे महात्मा फुले हायस्कूल व ज्युनियर कॉलेज सासवड या विद्यालयातील आठवीतील विद्यार्थी शिवराज नवनाथ अनपट याने ३०० पैकी २१२ गुण प्राप्त करून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे पूर्वमाध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी २०२४ यामध्ये जिल्ह्यात गुणवत्ता यादीत ८३ वा क्रमांक प्राप्त करून शिष्यवृत्ती मिळविली.
या परीक्षेमध्ये उत्तुंग यश मिळाल्याबद्दल १६ जुलै २०२४ रोजी संस्थेचे संस्थापक कै. नामदेवराव बळवंतराव सूर्यवंशी (बेडके) उर्फ नाना यांच्या २९ व्या स्मृतिदिनानिमित्त संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती सविताकाकी सुभाषराव सूर्यवंशी (बेडके), उपाध्यक्ष श्री. सी. एल. पवार, संस्थेचे मानद सचिव डॉ. सचिन सुभाषराव सूर्यवंशी (बेडके), नियामक मंडळाचे सदस्य श्री. महेंद्र सुभाषराव सूर्यवंशी (बेडके), सदस्य श्री. शिवाजीराव सूर्यवंशी (बेडके), श्री. प्रकाश तारळकर, प्रशालेच्या प्राचार्या सौ. काकडे एस. जी. मॅडम, सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी, पालक व ग्रामस्थ यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.