
दैनिक स्थैर्य । 7 मे 2025। फलटण । फलटण कृषी महाविद्यालयाचा खेळाडू कुमार पाटील भूषण महादेव याची राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी संघाचे नेतृत्व करण्यासाठी निवड झाली होती. या स्पर्धा आचार्य नरेंद्रदेव कृषी एव प्रायोगिक विश्वविद्यालय, अयोध्या या ठिकाणी दिनांक शुक्रवार दि. 2 मे ते सोमवार दि. 5 मे दरम्यान घेण्यात आल्या. या कबड्डी स्पर्धेत महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरीच्या संघाने अंतिम सामन्यात विजय मिळवून सुवर्णपदक मिळविले. या स्पर्धेसाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरीचे डॉ. सचिन नलावडे, प्रशिक्षक प्रा. रोशन सोडमिसे यांनी मार्गदर्शन केले.
यशस्वी खेळाडूंचे फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी अरविंद निकम, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण यांनी अभिनंदन केले.

