दैनिक स्थैर्य | दि. ८ मार्च २०२४ | फलटण |
सद्गुरु शिवाजी महाराज मठ, २५ फाटा, विडणी, ता. फलटण, जि. सातारा येथे श्री सद्गुरु शंकर महाराज धनकवडी निवासी (पुणे) यांचे परमशिष्य श्री सद्गुरु शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव महाशिवरात्रीनिमित्त मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सायंकाळी श्री सद्गुरु शिवाजी महाराज यांना भाविक भक्तांचे उपस्थितीत महाअभिषेक करण्यात आला.
त्यानंतर श्री सद्गुरू शिवाजी महाराज समाधीची फुलांनी आकर्षक अशी सजावट करण्यात आली. नंतर सद्गुरु शिवाजी महाराज यांची प्रतिमा पाळण्यात ठेवून पाळणा म्हणण्यात आला. महाआरती होऊन उपस्थित भाविक भक्तांना फराळाचे वाटप करण्यात आले. यावेळी ॐ दत्त चिले ॐ भजनी मंडळाचा सुश्राव्य असा भजनाचा कार्यक्रम झाला. दर्शनासाठी परिसरातील भाविक भक्तांनी गर्दी केली होती.