साताऱ्यात रविवारी महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद


स्थैर्य, 18 मार्च, सातारा : हिंदू जनजागृती समिती’ श्री जिवदानी देवी संस्थान (मुंबई), श्री ज्योतिर्लिंग भीमाशंकर देवस्थान आणि महाराष्ट्र मंदिर महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या २२ मार्चला येथील स्वराज मंगल कार्यालयात ‘चतुर्थ महाराष्ट्र मंदिर न्यास-परिषद आयोजिल्याची माहिती ‘मंदिर महासंघा’ चे महाराष्ट्र राज्य संघटक संजय जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जोशी म्हणाले, “लाखो वर्षांपासून हिंदू धर्माची आधारशिला असलेली मंदिरे ‘सेक्युलर ‘वादाच्या नावाखाली विविधआघात सहन करत आहेत. मंदिरांचे सरकारीकरण, सरकारीकरण झालेल्या मंदिरात भ्रष्टाचार, मंदिरांची भूमी बळकावणे, तिरुपती बालाजीसारख्या मंदिराच्या प्रसादात भेसळ, मंदिरांच्या भूमीवर ‘वक्फ’चे वाढते अतिक्रमण अशा समस्यांच्या निराकरणासाठी मंदिर महासंघ कार्यरत आहे. त्या दृष्टीने एकूणच अशा समस्यांवर व्यापक चर्चा व्हावी, मदिरांचे संघटन व्हावे, मंदिरांचे प्रश्न शासनाकडे मांडण्यासाठी पुढाकार घेण्यासाठी महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदेचे आयोजिली आहे. ही परिषद सकाळी
साडेआठ ते सायंकाळी सहापर्यंत चालेल. यास राज्यातून एक हजारहून अधिक निमंत्रित मंदिराचे विश्वस्त, प्रतिनिधी, पुरोहित, मंदिरांच्या रक्षणासाठी लढा देणारे अधिवक्ते, अभ्यासक सहभागी होणार आहेत.
यावेळी श्री. तुपे, श्री. सोनवणे म्हणाले, “या परिषदेस फलोत्पादनमंत्री भरत गोगावले, जैन मंदिराचे गिरीश शहा, मंदिर क्षेत्रात कार्यरत लेखक-अभ्यास संदीप सिंह, आळंदीच्या ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, देहू-आळंदी येथील मंदिरांचेविश्वस्त, ११ मारुती मंदिरांचे विश्वस्त, मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक सुनील चनवट, श्री अष्टविनायक मंदिरांचे विश्वस्त, महाराष्ट्रातील जोतिर्लिंग देवस्थानांचे विश्वस्त, सतानन संस्थेच्या सद्‌गुरू स्वाती खाडये आदी मान्यवर सहभागी होणार आहेत.”
यावेळी निळकंठ शिवाचार्य धारेश्वर महाराज, अधिवक्ता जनार्दन करपे, जिल्हा संयोजक शिवाजीराव तुपे, भुईंज महालक्ष्मी मंदिराचे गजानन भोसले, हिंदू जनजागृती समितीचे समन्वयक हेमंत सोनावणे उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!