स्थैर्य, सातारा दि.२६: महावितरण सातारा मंडल कार्यालयाच्या गेट समोर केंद्र सरकारच्या खाजगीकरण धोरणा विरूध्द महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसिटी वर्कर्स फेडरेशन सातारा सर्कलच्या व लाईन स्टाफ असोशिएशनच्यावतीने सातारा, कराड, फलटण, वाई, वडुज या विभागात 550 ते 600 वीजकामगार, अधिकारी यांनी संप पुकारला.
महापारेषण, महावितरण, एच. आर. मधील आणि तेलंगा राज्याप्रमाणे सर्वांना कंत्राटी कामगारांना कायम करा या मागणीसाठी 6 संघटना संपात उतरल्या होत्या. यावेळी विविध मागण्यांबाबत आपली भूमिका मांडली. जनतेच्या विरोधात केंद्र सरकार निर्णय घेत आहे. त्यामुळे त्या विरोधात आपणा सर्वांना आज रस्त्यावर उतरावे लागत असे मत यावेळी कर्मचार्यांनी व्यक्त केले.
देगाव फाटा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; तब्बल 9 दुकाने फोडली
एम एस ई बी वर्कर्स फेडरेशन महाराष्ट्र राज्य संयुक्त सचिव कॉ. नानासाहेब सोनवलकर, सातारा सर्कल सचिव कॉ. साहेबराव सावंत, कॉ. एम. डी. पवार, कॉ. विठ्ठल नलवडे, कॉ. अरूण पवार, कॉ. रमेश रजपुत कराड, कॉ. अनिल शिंदे, कॉ. प्रदिप शिंदे सातारा, कॉ. महेश सोनवलकर, कॉ. दिपक चव्हाण फलटण विभाग हे सर्व वर्कर्स फेडरेशनचे पदाधिकारी व लाईन स्टाफ असोशिएशनचे शिवाजी यादव, राहुल गुजर, अशोक फाळके भागवत ,हे पदाधिकारी व दोन्ही सघटनेचे सभासद बहुसंस्थेने उपस्थित होते.