विश्रांतवाडीतील अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराचा निषेध; नाभिक महामंडळाचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

पुणे येथील विश्रांतवाडीत अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेचा फलटण येथील महाराष्ट्र नाभिक महामंडळाने तीव्र निषेध नोंदवला. आरोपींना कठोर शिक्षा करून हे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालविण्याची मागणी करण्यात आली आहे.

स्थैर्य, फलटण, दि. ०६ ऑक्टोबर : पुणे शहरातील विश्रांतवाडी येथे नाभिक समाजातील एका ११ वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेचा महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला आहे. या अमानुष घटनेतील आरोपींवर कठोर कारवाई व्हावी आणि हे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवले जावे, या मागणीचे निवेदन फलटणच्या उपविभागीय अधिकारी (प्रांताधिकारी) प्रियांका आंबेकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी धन्यकुमार गोडसे यांना देण्यात आले.

अमानुष घटनेने समाजात तीव्र संताप

दिनांक २२ सप्टेंबर रोजी घडलेली ही घटना अत्यंत संतापजनक व मन हेलावून टाकणारी असल्याचे निवेदनात म्हटले आहे. अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या अशा अमानुष घटनांना आळा बसण्यासाठी आरोपींवर कायद्याच्या चौकटीत कठोर शिक्षा होणे अत्यंत आवश्यक आहे. समाजाची सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी प्रशासनाने तातडीने व कठोर पावले उचलण्याची गरजही या निवेदनाद्वारे व्यक्त करण्यात आली आहे.

नाभिक महामंडळाच्या प्रमुख मागण्या

या प्रकरणाचा तपास निष्पक्ष व वेगवान पद्धतीने करून आरोपीवर पॉक्सो (POCSO) कायद्यासह गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करावा. लवकरात लवकर दोषारोपत्र (चार्जशीट) न्यायालयात दाखल करून सुनावणी फास्ट ट्रॅक न्यायालयात घ्यावी आणि आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच, पीडित मुलगी व तिच्या कुटुंबाला संरक्षण देऊन वैद्यकीय आणि कायदेशीर मदत शासनाने उपलब्ध करून द्यावी, अशी आग्रही मागणी नाभिक समाजाच्या वतीने निवेदनात करण्यात आली आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!