दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा; कर्जवसुलीला स्थगिती आणि पीक कर्ज पुनर्गठनाचा सरकारचा निर्णय

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने पीक कर्ज वसुलीला स्थगिती देत कर्जाच्या पुनर्गठनाला मंजुरी दिली आहे.

स्थैर्य, सातारा, दि. ०१ ऑक्टोबर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने बाधित भागातील शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आलेल्या भागांमध्ये बँकांकडून होणाऱ्या शेतीकर्जाच्या वसुलीला तात्काळ स्थगिती देण्यात आली आहे. यासोबतच विद्यमान पीक कर्जाचे पुनर्गठन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे शेतकऱ्यांना पुढील हंगामासाठी नवीन कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

शेतकऱ्यांवर कारवाई न करण्याचे कडक आदेश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुष्काळामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांवर कोणत्याही प्रकारची सक्तीची कर्जवसुली केली जाणार नाही. सर्व सहकारी व राष्ट्रीयीकृत बँकांना यासंदर्भात निर्देश देण्यात आले असून थकबाकीदार शेतकऱ्यांची वीजजोडणी खंडित न करण्याचे आदेशही महावितरणला देण्यात आले आहेत.

इतर सवलती आणि शैक्षणिक फी माफी

कर्जवसुली स्थगितीसोबतच दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच रोहयोची कामे तातडीने सुरू करून शेतमजूर व शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे प्रशासनाला निर्देश देण्यात आले आहेत.

 

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!