दैनिक स्थैर्य | दि. ०१ नोव्हेंबर २०२१ | सातारा | महाराष्ट्र युवक काँग्रेस प्रदेश कार्यकारिणीची निवडणूक जाहीर झाली आहे . उमेदवारी अर्ज दाखल प्रक्रियेपासून सदस्य नोंदणी सह प्रदेश अध्यक्ष निवडीच्या तांत्रिक प्रक्रिया डिसेंबरमध्ये पूर्ण करून जानेवारी 2022 मध्ये नूतन प्रदेश कार्यकारिणीची निवड करणार असल्याची माहिती जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष विराज शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली .
यावेळी प्रदेश कार्यकारिणी निरीक्षक अनुराग ठाकूर, प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे, जिल्हा उपाध्यक्ष शैलेश चव्हाण, दादासाहेब काळे उपस्थित होते .
शासकीय विश्रामगृहात झालेल्या वार्तालापामध्ये विराज शिंदे म्हणाले, युवक काँग्रेस फार्म भरण्याची उद्याची 1 नोव्हेंबर शेवटची तारीख आहे. हा कार्यक्रम राहुल गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण भारतात होत आहे. सर्वसामान्य घरातील सर्वसमावेशक युवकांसाठी हे युवक काँग्रेसचे व्यासपीठ राहुल गांधी यांनी उपलब्ध केले आहे. या निवडणुकीसाठी सर्व जाती धर्माचे युवक सहभागी होत असतात. या प्रकियेत युवक येत असतात.हा निवडणुकीचा कार्यक्रम 27 ऑक्टोबर पासून सुरू झाला आहे. 1 नोव्हेंबर डेडलाईन आहे ही निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थेप्रमाणे होतील.
2 डिसेंबर रोजी छाननी व होईल. त्यानंतर जे उमेदवारी अर्ज राहतील त्याचे माघार घेणे मुदत 3 नोव्हेंबर आहे त्यानंतर उमेदवार निश्चित होतील. 12 नोव्हेंबर ते 13 डिसेंबरपर्यंत सभासद नोंदणी होईल त्यानंतर ओनलाईन ओटिंग होईल ही प्रकिया 13 डिसेंबरपर्यंत होईल त्यानंतर निवडणूक आयोग निकाल जाहीर करतील एका सभासद याला चार मतांचा अधिकार राहील. पहिलं मत प्रदेशाध्यक्ष पदासाठी असेल त्यानंतर प्रदेश सरचिटणीसपदासाठी असेल तर सातारा जिल्हाध्यक्ष पदासाठी एससी आणि एसटी हे राखीव आहे आणि विधानसभा अध्यक्ष पदासाठी एक असे प्रत्येक युवक काँग्रेस सभासदसाठी चार मते देण्याचा अधिकार राहील यासाठी 18 ते 35 वयोगट ची मर्यादा राहील . सातारा जिल्हा पुणे ग्रामीण व सांगली या तीन जिल्ह्यासाठी युवा काँग्रेस जिल्हाध्यक्षपद अनुसुचित जाती प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहे .
यासाठी निवडणूक लढवण्याची इच्छा आहे त्यांनी यामध्ये सहभाग घ्यावा आम्ही त्यांचे स्वागतच करू असे शिंदे म्हणाले
प्रदेश कार्यकारिणी सदस्य सचिव अनुरागठाकूर सिंग म्हणाले निवडणुकीच्या माध्यमातून नवीन पद्धधिकारी निवडण्यात येत आहेत तामिळनाडू येथे ही प्रक्रिया सुरू आहेत. 18 ते 35 यामधील सर्व युवक या निवड प्रक्रियेत सहभागी होतील. नॉमिनेशनबाबत माहिती देण्यात आली. यासाठी अँड्रॉइड अॅपद्वारे अॅप्लिकेशन डाऊनलोड करून त्यामध्ये माहिती भरता येऊ शकेल. नॉमिनेशन फी भरल्यानंतर12 नोव्हेंबरपासून 12 डिसेंबर पर्यंत आधारकार्ड, पासपोर्ट दिल्यानंतर वेबसाईटवर जाऊन याबाबतची संख्या पाहू शकाल.