
स्थैर्य, दहिवडी, दि. 24 : करोना विरोधात काम करण्यासाठी राज्य सरकार निष्क्रीय झाले आहे. असा आरोप करत राज्यातील महाराष्ट्र विकास आघाडीला जागे करून करोना रोखण्यासाठी काम करण्यास भाग पाडण्याच्या हेतूने भाजपचे राज्यभर ‘महाराष्ट्र बचाओ’ आंदोलन करणार असल्याचा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पक्ष पदाधिकार्यांच्या बैठकीत दिला होता. याच पार्श्वभूमीवर कोरोना नियंत्रणामध्ये अपयशी ठरलेल्या राज्य सरकारला जाब विचारण्यासाठी दहिवडी येथे महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्यात आले.
दहिवडी येथे आमदार जयकुमार गोरे व भाजप कार्यकर्त्यांनी सोशल डिस्टनसिंगचे पालन करत काळ्या फिती दाखवत निषेध व्यक्त केला. आ.जयकुमार गोरे यांनी आंदोलनास सुरवात केली. दहिवडीतील फलटण चौकात भाजप कार्यालयासमोर ते आंदोलनास उभे राहिले. आ. जयकुमार गोरेसह त्यांचे कार्यकर्ते या आंदोलनास उपस्थित होते.