
दैनिक स्थैर्य | दि. ११ मार्च २०२३ | फलटण |
महाराजस्व अभियान २०२३ अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना दाखले वाटप कार्यक्रम शुक्रवार, दिनांक १० मार्च २०२३ रोजी गिरवी (ता. फलटण) येथील श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय व जुनिअर कॉलेज येथे पार पाडला.
फलटणचे उपविभागीय अधिकारी श्री. शिवाजीराव जगताप यांचे मार्गदर्शनाखाली तहसीलदार समीर यादव व अप्पर तहसिलदार श्री. दादासाहेब दराडे यांच्या हस्ते हे अभियान पार पडले. यावेळी जय भवानी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. सहयाद्री भैया कदम उपस्थित होते. प्रमुख उपस्थितीत गिरवी ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच सौ. वैशाली राजेंद्र कदम, उपसरपंच श्री. संतोष मदने व ग्रामपंचायत सदस्य होते.
या महाराजस्व अभियानावेळी गिरवी, ता.फलटण येथे जातीचे दाखले ५० व डोमासाईल दाखले ६० असे एकूण ११० दाखले वाटप करणेत आले. यावेळी श्री. संतोष झनकर मंडलाधिकारी गिरवी, श्री. लक्ष्मण अहिवळे तलाठी गिरवी तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक व शिक्षक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी लक्ष्मण अहिवळे तलाठी, गिरवी व माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. भुजबळ सर यांनी विशेष परिश्रम घेतले.