दैनिक स्थैर्य | दि. २४ मे २०२३ | फलटण |
विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त वडजल येथील राजे ग्रुपने ‘महाराजसाहेब चषक २०२३’ स्पर्धेचे आयोजन केले होते.
या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ सातारा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दत्ता अनपट, फलटण नगरपरिषदेचे माजी नगरसेवक किशोर नाईक निंबाळकर, फलटण तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष जयकुमार इंगळे, सातारा जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस नितीन मदने, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अभिजीत निंबाळकर, भिलकटीचे माजी सरपंच रामचंद्र घोडके, वडजलचे माजी सरपंच काशिनाथ ढेंबरे, सावंतवाडाचे सरपंच प्रदीप सावंत, वडजलचे तंटामुक्ती अध्यक्ष चंद्रकांत पिसाळ, ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत सूळ, माजी उपसरपंच तुकाराम पिसाळ यांच्या उपस्थितीत पार पडला.
स्पर्धेचे प्रथम बक्षीस ३१,०००/- (धैर्यशील अनपट, माजी सदस्य, जिल्हा परिषद सातारा), द्वितीय बक्षीस २१,०००/- (सौ. सुवर्णाताई नंदकुमार नाळे, सरपंच, ग्रामपंचायत वाठार निंबाळकर), तृतीय बक्षीस ११,०००/- (शुभम मनोहर ढेंबरे, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर, वडजल) असे ठेवण्यात आले होते.
कार्यक्रमाचे संयोजक राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष निरंजन पिसाळ, वडजल राजे गटाचे युवा नेतृत्व स्वराज ढेंबरे, शुभम तांबे यांनी व सहकार्यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले.