माढा मतदारसंघातील दुष्काळी परिस्थितीबाबत रणजितदादांची मुख्यमंत्र्यांशी महत्त्वपूर्ण चर्चा; “सरकार शेतकरी व सामान्यांच्या पाठीशी खंबीर” – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

माढा मतदारसंघातील दुष्काळी परिस्थितीवर उपाययोजना करण्यासाठी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असून, मुख्यमंत्र्यांनी सर्वतोपरी मदतीची ग्वाही दिली आहे.

स्थैर्य, मुंबई, दि. १८ ऑक्टोबर : सध्या राज्यात आणि विशेषतः माढा लोकसभा मतदारसंघात निर्माण झालेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना सविस्तर माहिती दिली. या अत्यंत महत्त्वपूर्ण बैठकीवेळी राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

या बैठकीदरम्यान माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मतदारसंघातील पाणीटंचाई, पिकांचे झालेले नुकसान आणि शेतकऱ्यांच्या व्यथा मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. दुष्काळग्रस्तांना तातडीने दिलासा देण्यासाठी आणि आवश्यक त्या उपाययोजना राबवण्यासाठी राज्य शासनाने त्वरित पावले उचलावीत, अशी आग्रही मागणी रणजितदादांनी याप्रसंगी केली.

रणजितदादांनी मांडलेल्या वस्तुस्थितीची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळग्रस्तांना भक्कम आश्वसन दिले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “आपले सरकार हे सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. या भीषण दुष्काळी परिस्थितीमध्ये सुद्धा सरकार हे सर्वसामान्य नागरिकांचा आणि बळीराजाचा विचार करूनच हिताचे निर्णय घेणार आहे.”

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर नेहमीच शासनाकडे पाठपुरावा करणाऱ्या माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या या पुढाकारामुळे माढा मतदारसंघातील दुष्काळग्रस्त भागातील जनतेला मोठा दिलासा मिळाला असून, शासनाकडून लवकरच सकारात्मक मदतीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!