एम. बी. पतकी यांचे निधन


दैनिक स्थैर्य | दि. १८ जून २०२४ | सातारा |
युनायटेड वेस्टर्न बँकेतील सेवानिवृत्त अधिकारी मच्छिंद्र बाळकृष्ण (एम. बी.) पतकी यांचे वृद्धापकाळाने रविवारी निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते.

युनायटेड वेस्टर्न बँकेच्या केवळ सहा शाखा असताना ते बँकेत रुजू झाले होते. कर्तव्यकठोर, बँकिंग क्षेत्रात अभ्यासू, तत्वनिष्ठ अधिकारी म्हणून त्यांचा नावलौकिक होता.इन्स्पेक्शन सेशनमध्ये त्यांनी आपला ठसा उमटवला होता. विदर्भातील नव्याने सुरू केलेल्या शाखा प्रगतीपथावर आणण्यात त्यांचा मोलाचा सहभाग होता.

त्यांच्या पश्चात पत्नी, पत्रकार मधुसूदन पतकी, मनोज पतकी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

एम. बी. पतकी यांना खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांनी श्रद्धांजली वाहून त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. अंत्यसंस्कारास समाजातील प्रतिष्ठित मान्यवर, पत्रकार, बँकेतील कर्मचारी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!