
दैनिक स्थैर्य | दि. २१ ऑगस्ट २०२३ | फलटण |
जिल्हा परिषद सेस २०२३-२४ अंतर्गत पंचायत समितीच्या कृषी विभागाने फलटण विकास गटातील शेतकर्यांकडून विविध शेती उपयोगी अनुदानित औजारे खरेदीसाठी १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत अर्ज मागविले होते.
या प्राप्त अर्जातून उद्दिष्टाप्रमाणे लाभार्थी निवड करण्यासाठी शुक्रवार, दि. २५ ऑगस्ट रोजी सकाळी ११.०० वाजता पंचायत समिती सभागृहामध्ये लॉटरीद्वारे लाभार्थी निवड करण्यात येणार आहे. ज्या शेतकर्यांनी पंचायत समितीकडे औजारे मागणी अर्ज सादर केले आहेत, त्यांनी लॉटरीसाठी पंचायत समिती सभागृहामध्ये शुक्रवार, दि. २५ ऑगस्ट २०२३ रोजी उपस्थित रहावे, असे आवाहन पंचायत समितीचे प्रशासक तथा गटविकास अधिकारी श्री. चंद्रकांत बोडरे व कृषी अधिकारी श्री. नवनाथ फडतरे यांनी केले आहे.