लॉकडाउनवरून आघाडीत बिघाडी?

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, दि. 2 :  महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडी  सरकारमध्ये लॉकडाउन  वाढवल्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा अंतर्गत धुसफूस आणि नाराजीनाट्य सुरू झालं आहे. अद्याप महाविकास आघाडीचा कुठलाही नेता अधिकृतपणे या विषयी बोललेला नाही. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल काँग्रेसच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर आता राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनीसुद्धा त्यांच्यात सूर मिसळल्याची सूत्रांची माहिती आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विश्‍वासात न घेता निर्णय घेतात, अशी तक्रार काही नेत्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे केली आहे. आता शरद पवार या संदर्भात उद्धव ठाकरे यांची भेट घ्यायची शक्यता असल्याचं वृत्त टाइम्स नाऊने दिलं आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीत राजकीय मतभेद निर्माण व्हायला सुरुवात झाली आहे. आता आघाडीत बिघाडी तर होणार नाही ना अशी दबक्या सुरात चर्चा आहे.

महाराष्ट्रात उेीेपर्रींर्ळीीी चा संसर्ग वाढतोच आहे. णपश्रेलज्ञ च्या पहिल्या टप्प्यातच मुंबई, पुण्यासह मोठ्या शहरांमध्ये रुग्णसंख्या दुपटीने वाढली. त्यावर उपाय म्हणून आता काही उपनगरांमध्ये लॉकडाउनचे निर्बंध कडक करण्यात आले आहेत. पण लॉकडाउन वाढवायचा की काही सवलती द्यायच्या याबाबतचा निर्णय घेण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी विश्‍वासात घेतलं नाही, अशी काँग्रेसच्या नेत्यांची तक्रार होती.

29 जूनला लॉकडाउन वाढल्याचा सरकारी आदेश आला तेव्हाच राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनाही याची माहिती मिळाली. याच कारणामुळे या दोन्ही पक्षातील काही नेतेमंडळी नाराज आहेत, असं वृत्त फ्री प्रेस जर्नलने दिलं आहे. महत्त्वाच्या निर्णयामध्ये डावलल्याची भावना काँग्रेस आणि राष्ट्रवादी या घटक पक्षांत आहे आणि त्यांनी त्यांच्या भावना शरद पवार यांच्या कानावर घातल्या असल्याचं समजतं. महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीचे शरद पवार हे शिल्पकार मानले जातात. त्यामुळे त्यांच्याच पुढाकाराने ठाकरेंपुढे ही नाराजी उघड केली जाण्याची शक्यता आहे. शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस राज्याच्या अर्थविकासाच्या दृष्टीने व्यवहार खुले करण्याच्या विचारात होते. पण उद्धव ठाकरे सरकारने मात्र त्यांना विश्‍वासात न घेताच लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतला, असं सूत्रांनी सांगितलं.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!