ट्रेडिंगची सुरुवात करताना दीर्घकाळ गुंतवणूक ठरते उपयुक्त : एंजल वन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०७ एप्रिल २०२३ । मुंबई । ट्रेडिंगची सुरुवात करताना झटपट लाभ कमावण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा दीर्घकाळ गुंतवणूक करणे केव्हाही अधिक चांगले असते. बाजारातील चढउतारांचा परिणाम आपल्या गुंतवणूकीवर कमी प्रमाणात व्हावा म्हणून विविध ठिकाणी गुंतवणूक करावी. तसेच स्वस्त भासणाऱ्या जंक काउंटर्सची खरेदी करण्यापेक्षा दर्जेदार समभागांवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला एंजन वन लि. चे टेक्निकल अॅण्ड डेरिव्हेटिव्ह रिसर्चचे वरिष्ठ विश्लेषक श्री. ओशो कृष्णन यांनी दिला.

ट्रेडिंगमध्ये प्रवास सुरू करणा-या नवशिक्यांनी बँकिंग क्षेत्रातील गुंतवणूकीचा एक अनुकूल पर्याय अॅक्सिस बँक, एक समूह म्हणून आघाडीच्या दिग्गज समभागांपैकी एक रिलायन्स, औषधनिर्माण क्षेत्रातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या कंपन्यांपैकी एक सनफार्मा, दमदार तंत्रज्ञानात्मक कंपनी एलटी, आयटी पॅकमधील आघाडीचे नाव टीईसीएचएममध्ये गुंतवणूक करण्याची शिफारस श्री कृष्णन यांनी केली आहे.

अॅक्सिस बँक:

 आत्तापर्यंतच्या सर्वाधिक उंचीवरून सुमारे १५ टक्क्यांनी सुधारणा (करेक्शन)

 दैनंदिन तक्त्यावर, २०० एसएमएच्या (सिम्पल मुव्हिंग अॅव्हरेज) आसपास भ्रमंती, याचा अर्थ या समभागांना भक्कम पाठिंबा आहे

 साप्ताहिक तक्त्यावर, हा समभाग ब्रेकआउटच्या नेकलाइनकडे जात आहे, ही नेकलाइन ८००-८१० या क्षेत्रात आहे

 हा समभाग ९५०-९७० या श्रेणीत पोहोचणे अपेक्षित आहे

 हे समभाग जमा करण्यासाठी चांगली संधी आहे

रिलायन्स:

 आत्तापर्यंतच्या सर्वाधिक उंचीवरून सुमारे २० टक्क्यांची तीव्र सुधारणा समभागांमध्ये झाली आहे

 सध्या या समभागाचे बाजारातील मूल्य २२००च्या आसपास आहे

 तुलनात्मक कालखंडात हा समभाग २४५० व २६०० ह्यांतील वरील बाजू गाठेल असे अपेक्षित आहे

 अलीकडेच झालेली घसरण ही समभागात गुंतवणूक करण्याची संधी आहे, कारण रिलायन्स ही मुलभूतरित्या भक्कम कंपनी आहे व पुढेही ती चांगली कामगिरी करेल असे अपेक्षित आहे

सनफार्मा:  

 करेक्शनमुळे हा समभाग दैनंदिन तक्त्यावर २०० पर्यंत आला आहे, त्यामुळे जोखीम-मोबदला दृष्टिकोनातून हा तगडा प्रतिस्पर्धी आहे

 हा समभाग ९८०-९६० क्षेत्रात आहे आणि तो १०५०-१०७० या क्षेत्रात पोहोचण्याची शक्यता आहे

 तुलनात्मक कालखंडात आत्तापर्यंतच्या सर्वोच्च क्षेत्रात प्रवेश करण्यास हा समभाग सज्ज आहे

 मध्यम कालावधीच्या गुंतवणूक लक्ष्यांसाठी समभाग खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी हे समभाग जमवण्याची संधी आहे

एलटी:

 सध्या दैनंदिन तक्त्यावर हा समभाग आपल्या ईएमए पुंजक्याजवळ भ्रमंती करत आहे आणि हे सकारात्मक लक्षण आहे

 सध्या हा समभाग २१००-२००० या क्षेत्रात आहे आणि नजीकच्या मुदतीत तो २४००-२५०० क्षेत्रात पोहोचणे अपेक्षित आहे

 २००० उपक्षेत्रात तात्पुरते स्थित्यंतर झाले तरीही मध्यम ते दीर्घ मुदतीच्या दृष्टिकोनातून हे समभाग जमा करण्यासाठी ही संधी आहे

टीईसीएचएम:  

 आत्तापर्यंतच्या सर्वाधिक उंचीवरून सुमारे ४० टक्के सुधारणा

 सध्या हा समभाग १०५०-१०४० क्षेत्रात आहे आणि समभागाचे उद्दिष्ट १३००-१३२५ या दर क्षेत्रात जाण्याचे आहे.

 हा समभाग २०० एसएमएच्यावर भ्रमंती करत आहे. हा अनुकूल निदर्शक आहे

 गेल्या तीन तिमाहींमध्ये विक्रीचा सपाटाला थांबला आहे

 १००० उपक्षेत्राच्या दिशेने झालेली घसरण म्हणजे मध्यम मुदतीच्या दृष्टिकोनातून समभाग जमवण्यासाठी चांगली संधी ठरेल


Back to top button
Don`t copy text!