भैरवनाथ जोगेश्वरी यात्रेस खोचीमध्ये प्रारंभ


दैनिक स्थैर्य । दि. ०७ एप्रिल २०२३ । सातारा । महाराष्ट्र-कर्नाटकातील लाखो भाविकांचे अढळ श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र खोची (ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) येथील प्रसिद्ध भैरवनाथ जोगेश्वरी देवाची चैत्र पौर्णिमा यात्रा आज गुरुवारपासून (दि. ६) सुरु झाली आहे. रात्री १२ वाजता चैत्र बनात पालखी सोहळा व सासनकाठी मिरवणूक होवून प्रत्यक्ष यात्रेतील पूजा, विधी, धार्मिक कार्यक्रमांना प्रारंभ होत आहे.

खोची ग्रामस्थांचे ग्रामदैवत तर अन्य ठिकाणच्या लोकांचे आराध्यदैवत असलेले भैरवनाथ जोगेश्वरी हे जागृत देवस्थान आहे. शुक्रवारी (दिं. ७) सकाळी ६ वाजून २७ मिनिटांनी सूर्योदयाला अक्षता आहेत. तर पुढील रविवारी (दि. १६)  ग्रामस्थांची गावयात्रा. रात्री ९ वाजता मंदिरात पालखी सोहळा.  २० एप्रिलला गुरव समाजाची पाकाळणी यात्रा. दुपारी १२ वाजता पालखी सोहळा होणार आहे.


Back to top button
Don`t copy text!