दैनिक स्थैर्य । दि. २० एप्रिल २०२२ । फलटण । राज्य परिवहन महामंडळाच्या म्हणजेच एसटी महामंडळाच्या फलटण आगारातुन लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू करण्यात आलेल्या आहेत. याबाबत सोशल मिडीयावर त्याचे वेळापत्रक चांगलेच व्हायरल होत आहे.
गेल्या काही महिन्यांपासून एसटी कर्मचार्यांच्या संपामुळे कोणत्या बसेस सुरू ? कोणत्या बंद ? असे विविध प्रश्न सर्वसामान्य प्रवाशांच्या मनामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यामुळे बसेसचे वेळापत्रक चांगलेच व्हायरल होत आहे.
फलटण ते सातारा ही बससेवा सकाळी ०६.३० वाजल्यापासून दर तासाला सुरू करण्यात आली आहे.
फलटण ते बारामती ही बससेवा सकाळी ०६.१५ वाजल्यापासून दर अर्ध्या तासाला सुरू करण्यात आली आहे.
फलटण ते स्वारगेट (पुणे) ही बससेवा सकाळी ०६.०० वाजल्यापासून दर अर्ध्या तासाला सुरू करण्यात आली आहे.
फलटण वरून बोरिवलीसाठी सकाळी ६, ७, ७.३०, ८, ८.३० (ठाणे मार्गे), ९.३०, १०.३०, दु. ०१, दु. ०२, दु. ०३.१५, दु. ०४.३०, सायं. ०६. ३०, रात्री ०८.३० यावेळी एसटी बस फलटण आगाराच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या आहेत.
फलटण ते दादर ही एसटी बस सकाळी ०६.३० वा. सुरू करण्यात आलेली आहे.
फलटण ते मुंबई सेंट्रल ही बस सकाळी ११.३० व रात्री १० वाजता सुरू करण्यात आली आहे.
फलटण ते मलकापुर ही बस सकाळी ०७.४५ व ०८.४५ वाजता सुरू करण्यात आली आहे.
फलटण ते अक्कलकोट ही बस ०६.३० वाजता सुरू करण्यात आली आहे.
सकाळी ०६.३० वाजता फलटण ते इचलकरंजी ही बस सुरू करण्यात आलेली आहे.
फलटण ते जोतिबा ही बस सकाळी ०६.३० वाजता सुरू करण्यात आली आहे.
सकाळी ०५.४५ वाजता फलटण ते शिर्डी ही बस सुरू करण्यात आली आहे.
फलटण ते सांगली ही बस सकाळी ०८ वाजता व ०८.४५ वाजता सुरू करण्यात आली आहे.